आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिंपिक चार्टड लोगोद्वारे गे कम्युनिटीला Googleचा पाठिंबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 2014 विंटर ऑलिंपिकसाठीचा पहिला लोगो गुगल डुडलवर लावण्यात आला आहे. यात इंद्रधनुष्याच्या रंगात खेळाडू दाखविण्यात आले आहेत. या रंगांना गे प्राईड फ्लॅगही म्हटले जाते. गे कम्युनिटीच्या हक्कांना रशियन सरकारचा विरोध आहे. विंटर ऑलिंपिक रशियात आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे इंद्रधनुच्या रंगात असलेले डुडल वापरुन रशियन सरकारच्या भूमिकेचा गुगलने एक प्रकारे निषेध नोंदविला आहे.
गुगल डुडलमध्ये वापरण्यात आलेला लोगो ऑलिंपिक चार्टडसोबत लावण्यात आला आहे. त्याचा अर्थ असा होतो, "खेळणे हा मानवी अधिकार आहे. प्रत्येक माणसाला कोणत्याही भेदभावाशिवाय आणि ऑलिंपिकच्या भावनेत खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. ज्यासाठी मैत्री, ऐक्यभाव आणि निःपक्ष व्यवहाराच्या भावनेसह आपसात सौदार्ह असणे गरजेचे आहे."
गे कम्युनिटी विरोधी कायदे आणि प्रचारामुळे रशियात विंटर ऑलिंपिक गेम्स घेण्याचा निर्णय बराच वादग्रस्त राहिला आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचाही गे कम्युनिटीच्या हक्कांना विरोध आहे. त्यामुळे रशियन सरकारच्या भूमिकाचा निषेध करण्यासाठी गुगलने अशा स्वरुपाचे डुडल लावल्याचे दिसून येते.
विंटर ऑलिंपिकसाठी गुगने वेगवेगळे डुडल तयार केले आहे. एखाद्या दिवशी असलेली स्पर्धा किंवा त्या दिवसाच्या महत्त्वानुसार डुडल बदलविण्यात येणार आहे.