आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govindarsingh Chandi News In Marathi, Divya Marathi, Commonwealth Game

गुरविंदरचे कमबॅक; भारताचा दावा मजबूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येत्या 23 जुलैपासून सुरू होणा-या राष्‍ट्रकुल स्पर्धेत सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारताचा पुरुष हॉकी संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पदकाचा दावा आता अधिकच मजबूत झाला. तब्बल 18 महिन्यांनंतर गुरविंदरसिंग चांडीने भारतीय संघात पुनरागमन केले आहे.

‘राष्‍ट्रकुल स्पर्धेसाठी मला भारतीय संघाकडून खेळण्याची मोठी संधी मिळाली. या संधीचे चीज करताना भारतीय संघाला पदक मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल,’अशी प्रतिक्रियाही गुरविंदरसिंग चांडीने दिली. आतापर्यंत 97 आंतरराष्‍ट्रीय सामन्यांत गुरविंदरसिंगने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 137 आंतरराष्‍ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या
एसव्ही सुनीलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला.

‘भारतीय हॉकी संघ आगामी राष्‍ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. गुरविंदरसिंगच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाचा दावाही मजबूत झाला आहे. या स्पर्धेत त्याच्याकडून मोठ्या खेळीची आशा आहे. त्यासोबतच आकाशदीप आणि रमणदीप यांच्याकडूनही समाधानकारक कामगिरीची अपेक्षा आहे,’ असे मत भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी मांडले. विश्वचषक हॉकी स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या रमणदीप आणि थिमय्या या युवा खेळाडूंनाही राष्‍ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली. गुरविंदरसिंग चांडीच्या रूपात भारताकडे अनुभवी खेळाडंूचा समावेश आहे.

18 महिन्यांनंतर संघात गुरविंदर सिंगला स्थान
97 आंतरराष्‍ट्रीय सामन्यांचा गुरविंदर सिंगला अनुभव

भारताचे सामने असे
25 जुलै वेल्सविरुद्ध
26 जुलै स्कॉटलंडविरुद्ध
29 जुलै ऑस्ट्रेलियाविरुद्ध
31 जुलै द. आफ्रिकाविरुद्ध
137 सामन्यांचा एस. सुनीलला अनुभव