औरंगाबाद- गुडलक क्लबने जीपीएल टेनिसबॉल क्रिकेट (जिन्सी प्रीमियर लीग) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या संघाने स्पर्धेतील अंतिम सामन्यात नाना क्रिकेट क्लबचा 15 धावांनी पराभव केला. अब्दुल रहिमच्या शानदार शतकाच्या बळावर गुडलकने विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना गुडलक क्रिकेट क्लबने दहा षटकांमध्ये 6 गडी गमावून 103 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात नाना क्रिकेट क्लबने अवघ्या 88 धावांत गाशा गुंडाळला. नगरसेवक डॉ. जफर खान व नगरसेवक मिलिंद दाभाडे यांच्या हस्ते विजेत्या संघास प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह वितरण करण्यात आले. नगरसेवक अज्जू पहेलवान व नगरसेवक अमित भुईगळ यांच्या हस्ते उपविजेत्या नाना क्लबचा गौरव करण्यात आला.
या वेळी नगरसेवक हबीब कुरेशी, गौतम खरात, लियाकत पठाण, कलीम कुरेशी, हाजी समीर खान, सुनील घाटे, रफिक अहेमद, शेख क ादर, शेख अन्वर, शेख वसीम आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी सलीम कुरेशी, आसिफ मितवा, हारुण आमला, अब्दुल बासित, सय्यद रियाज, अक्रम बिल्डर, शकील कुरेशी, मोईन मामे, शेख फारुख, अय्युब कुरेशी, नईम कुरेशी, महंमद जावेद, शेख नईम, ए. जे. शेख, जमील पटेल, शेख जावेद, शेख कलीम यांनी विशेष परिश्रम घेतले.