आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा डेस्क- दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार ग्रॅहम स्मिथ एक नवा इतिहास लिहणार आहे. पाकिस्तानविरोधात 1 फेब्रुवारीपासून जोहान्सबर्ग येथे होणा-या पहिल्या कसोटीत मैदानात उतरताच कसोटी क्रिकेटमध्ये 100 कसोटीत कर्णधार भूषविणारा स्मिथ पहिला खेळाडू ठरणार आहे. ऑस्ट्रेलियापासून इंग्लंड असो, नाहीतर भारतापासून वेस्ट इंडीज असो कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नाही. आपल्या संघाला क्रिकेटच्या सर्व प्रकारात नंबर एक नेणारा कर्णधार स्मिथ हा एक दर्जेदार खेळाडू ते महान खेळाडूंच्या पक्तीत जावून बसला आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशा काही दिग्गज कर्णधारांनी आपल्या सक्षम नेतृत्त्वामुळे संघाला एका ऊंचीवर नेऊन ठेवले आहे. टीम इंडियाच्या बाबतीत बोलायचे झाले तर सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी या दोन कर्णधारांची नावे घ्यावी लागतील ज्यांनी भारतीय संघाला एका वेगळ्या ऊंचीवर नेले. महेंद्रसिंग धोनीवर आता कितीही टीका होत असली तरी त्याने भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून दिले आहे हे कोणीही नाकारु शकत नाही. परदेशात कसोटी मालिका जिंकायच्या याची सवय सौरव गांगुलीनेच लावली हे सत्य आपण नाकारु शकत नाही.
ऑस्ट्रेलियाचे ऍलन बॉर्डर, रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह वा यांना जर कोणी टक्कर दिली तर ती मोहमंद अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांनीच. 1 फेब्रुवारीपासून स्मिथ आपल्या देशात पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करण्याच्या प्रयत्नात आहे तर, 22 फेब्रुवारीपासून धोनी ब्रिगेड कांगारुशी दोन हात करायला तयार आहे.
पुढे क्लिक करा व जाणून घ्या ग्रॅहम स्मिथ आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या कर्णधारपदाच्या कामगिरीबाबत....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.