टेस्ट सिरीजचा जगातील 1 नंबरचा कर्णधाराचा बहुमान मिळवणारा साउथ अफ्रिखेचा कर्णधार स्टार ग्रीम स्मिथने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध केप टाउनमध्ये खेळलेला सामना त्याच्या करिअरचा शेवटचा सामना ठरणार आहे.
मॅच संपल्यानंतर तिस-याच दिवशी स्मिथने निवृत्तीचा निर्णय जाहिर केला आहे. चांगली खेळी करत त्याच्या टीमने त्याला चांगला निरोप देता आला नाही. तरी त्याच्या कुटुबीयांनी त्याचा क्रिकेटमधून सन्यास घेण्याचा क्षण उपस्थिती लावून खास बनवला.
केप टाउन टेस्ट सिरीजच्या शेवटच्या दिवशी ग्रीम स्मिथ याची पत्नी मॉर्गन तिच्या दोन्ही मुलांसोबत स्टेडीअम मध्ये पोहचली. साउथ अफ्रिकेच्या टिमला प्रत्येक गोष्टीत नंबर 1 करणारा स्मिथ आता त्याच्या कॅडेन्स आणि कार्टर या दोन मुलांना आता जास्त वेळ देऊ शकेल.
अनोखा योगायोग, हार मानत स्वीकारावी लागली निवृत्ती
टेस्ट मॅच कर्णधारासोबतच सर्वात जास्त मॅच जिंकण्याचा रेकॉर्डही स्मिथच्या नावावर आहे. स्मित कर्णधार असताना साउथ अफ्रिकेने 53 सामने जिंकले आहेत तर रिकी पॉटिंग कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने 41 सामने जिंकले आहेत.
हा एक अजब योगायोग म्हणता येईल. जेव्हा रिकी पॉटिंगने निवृत्ती घेतली तेव्हा ऑस्ट्रेलियाला, साउथ अफ्रिकेकडून पराभव पत्कारावा लागला होता आणि आता स्मिथने निवृत्ती घेताना घरच्याच खेळ पट्टीवर साउथ अफ्रिकेला कांगारूनी पराभुत केले.
टिमला सर्वात जास्त विजय मिळवून देणा-या कर्णधाराला पराभवाने निवृत्ती स्वीकारावी लागली आहे.
सचिनही ठरला विनर
टेस्टमध्ये सर्वाच जास्त धावा काढणारा
सचिन तेंडूलकर निवृत्त झाला तेव्हा भारतीय संघाला विजय मिळाला होता. त्यावेळी भारताने वेस्ट इंडीजला पराभुत केले होते. या खास क्षणी त्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये त्याची आई, मोठा भाऊ अजित, पत्नी अंजली आणि त्याची मुले सारा आणि अर्जून वानखेडे स्टेडिअमवर उपस्थित होते.
पुढील स्लाइडवर पाहा टेस्टच्या सर्वोत्कृष्ट कर्णधाराचे आणि इतर खेळाडूंचे निवृत्तीचे काही फोटो...