आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Graeme Smith To Retire After South Africa Vs Australia Test Series

खराब फॉर्मनंतर द. आफ्रिकेच्या युवा कर्णधाराने लगेच घेतली निवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केप टाउन- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसर्‍या आणि निर्णायक लढतीत दक्षिण आफ्रिकेचा युवा कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. न्यूलॅंड्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेच्या तिसर्‍या सामन्यातच स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्‍याचा निर्णय जाहीर केल्याने क्रिकेट वर्तुळात उलटसूलट चर्चेला उधाण आले आहे.

यजमान ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. तिसर्‍या दिवशी पहिला डाव सात बाद 494 धावांवर 'डिक्लेअर' केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने साउथ आफ्रिका संघाला पहिल्या इनिंगमध्ये 287 धावांवरच गुंडाळले. या मा‍लिकेतील आपल्या संघाच्या सुमार कामगिरीची नैतिक जबाबदारी स्विकारत कर्णधार स्मिथने दिवसाच्या खेळ संपल्यानंतर स्वेच्छानिवृत्तीची घोषणा केली.

'माझ्यासाठी हा आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंग आहे. गेल्या वर्षी पायाला दुखापत झाल्यानंतर निवृत्ती घेण्याबाबत विचार केला होता. आता निवृत्तीची घोषणा करून त्याला मूर्त स्वरुप दिले आहे. वयाच्या अठरा वर्षांचा असताना या मैदानावर क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याच मैदानावर निवृत्ती घेणार असल्याचे स्मिथने सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत स्मिथला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. तीन डावात त्याने फक्त 42 धावा केल्या आहेत. आपल्या खराब फॉर्ममुळे स्मिथने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये द. आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसने निवृत्ती जाहीर केली होती. आता स्मिथने निवृत्ती जाहीर केल्याने आफ्रिकेच्या संघात मोठी पोकळी निर्माण होणार आहे. स्मिथने कारकिर्दीत 117 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी तब्बल 109 सामन्यात स्मिथने आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवले आहे. विशेष म्हणजे स्मिथच्या नेतृत्वात आफ्रिकेने 53 कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.