आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Graeme Swann Announces His Retirement From Cricket

ग्रीम स्वानची अचानक निवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - इंग्लंडचा फिरकीपटू ग्रीम स्वानने आंतरराष्ट्रीय आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. आॅस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेच्या चौथ्या कसोटीपूर्वीच त्याने हा निर्णय घेतल्यामुळे इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. स्वानने मागील पाच वर्षांपर्यंत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले. इंग्लंडकडून 60 कसोटी सामने खेळून त्याने 255 विकेट घेतल्या. इंग्लंड संघाकडून सर्वाधिक बळी मिळवणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तो सहावा खेळाडू आहे.
स्वानच्या अचानक निवृत्तीमुळे इंग्लंडच्या संघाला मोठा झटका बसला आहे. कारण सध्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिले तीन सामने इंग्लंडने गमावले आहेत. यात स्वानचे प्रदर्शनही तितकेसे चांगले नव्हते. मालिकेतील तीन सामन्यांत 80.00 च्या सरासरीने त्याने 7 विकेट मिळवल्या.