आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) न्यूझीलंडविरूद्ध होणा-या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी ग्रॅहम थोर्पची फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. तो आता ग्रॅहम गुचची जागा घेईल.
मर्यादित षटके आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक नेमण्याची ईसीबीने रणनीती अवलंबली आहे. त्यांनी नुकतेच अॅश्ले जाईल्सला एकदिवसीय आणि टी- 20 क्रिकेटच्या प्रशिक्षकपदी नेमले होते. तर अँडी फ्लॉवर कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहील.
न्यूझीलंड दौ-यानंतर थोर्पच्या नेमणुकीची समीक्षा केली जाईल आणि त्यानंतर त्याला पूर्णवेळ प्रशिक्षकपदी नियुक्त करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे ईसीबीचे व्यवस्थापक व्यवस्थापक ह्यू मॉरिस यांनी म्हटले. नुकताच इंग्लंडचा संघ टीम इंडियाविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत पराभूत झाला आहे. त्यामुळे संघाची कामगिरी सुरळीत करण्याचे त्याच्यासमोर मोठे आव्हान असेल.
ते जर पहिल्या चाचणीत यशस्वी झाले तर इंग्लंडमध्ये होणा-या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि पुढच्या वर्षी मार्च महिन्यात बांगलादेशमध्ये होणा-या टी-20 विश्वचषकापर्यंत संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.