आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऍशेसच्‍या पराभवाची बलात्‍कारासोबत तुलना करणा-या ग्रॅमी स्‍वानचा क्रिकेटला अलविदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऍशेस मालिकेत ऑस्‍ट्रेलियाकडून झालेला पराभव इंग्‍लंडच्‍या खेळाडुंच्‍या जिव्‍हारी लागला आहे. हा पराभव म्‍हणजे बलात्‍कारासारखा वेदनादायी असल्‍याचे वक्तव्‍य करणारा ग्रॅमी स्‍वानने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. त्‍याच्‍या निवृत्तीमुळे इंग्‍लंडला मोठा धक्‍का बसला आहे. कारण, ऍशेस मालिकेत आणखी 2 कसोटी सामने शिल्‍लक आहेत. त्‍यानंतर वन डे सामन्‍यांचीही मालिका आहे.

ऑस्‍ट्रेलियाने इंग्‍लंडला पर्थ कसोटीमध्‍ये पराभूत करुन ऍशेसवर पुन्‍हा ताबा मिळविला. त्‍यामुळे इंग्‍लंडचे खेळाडू व्‍यथित झाले आहेत. त्‍यातच स्‍वान आणि त्‍याच्‍या भावामध्‍ये फेसबुकवर झालेले संभाषण उघड झाले. त्‍यात स्‍वानने ऍशेसच्‍या पराभवानंतर बलात्‍कार झाल्‍यासारखे वाटत असल्‍याची भावना व्‍यक्त केली होती. हे वक्तव्‍य ब्रिटीश प्रसारमाध्‍यमांनी प्रसिद्ध केले. त्‍यावरुन त्‍याच्‍यावर प्रचंड टीका झाली होती. अखेर त्‍याने निवृत्ती जाहीर केली.

निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना त्‍याने सांगितले, की मी खूप विचार करुन हा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी हा अतिशय कठीण निर्णय होता. पर्थ कसोटीच्‍या मध्‍यात निवृत्तीचा विचार मनात आला होता.

ऍशेसच्‍या पराभवानंतर स्‍वान प्रचंड तणावात होता. त्‍याने 3 सामन्‍यांमध्‍ये फक्त 7 विकेट्स घेतल्‍या. पर्थ कसोटीतही तो अपयशी ठरला होता. शेन वॉटसनने दुस-या डावात त्‍याच्‍या एकाच षटकात 22 धावा ठोकल्‍या होत्‍या. स्‍वॉनची कसोटी कारकिर्द चांगली राहिली आहे. त्‍याने 5 वर्षांच्‍या छोट्या कारकिर्दीत 255 विकेट्स घेतल्‍या. गेल्‍या वर्षी इंग्‍लंडने भारताला भारतातच कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्‍यात स्‍वॉनची गोलंदाजी प्रभावी ठरली होती. स्‍वानने 2011 मध्‍येही निवृत्तीचा विचार केला होता.