Home | Sports | From The Field | greg chappell's tips will not be useful for australia

गुरु ग्रेगच्‍या सल्‍ल्‍यांचा ऑस्‍ट्रेलियाला फायदा तर दुर फटकाच बसेलः गांगुली

वृत्तसंस्था | Update - Dec 19, 2011, 01:27 AM IST

सचिन आगामी मालिकेतही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खो-याने धावा काढेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला.

 • greg chappell's tips will not be useful for australia

  नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांची ‘ती’ नीती यशस्वी होणार नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केल्यामुळे चॅपल यांना टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या खेळातील दुबळ्या बाजू माहिती आहेत. आगामी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी सचिन, सेहवागसारख्या दिग्गज फलंदाजांच्या या दुबळ्या बाजू ऑस्ट्रेलिया संघाच्या निर्देशनास आणून भारतीयांना दगा देण्याचा चॅपल यांनी डाव आखला आहे.
  मात्र, ग्रेग चॅपल यांच्या उपस्थितीचा आणि त्यांच्या सल्ल्याचा ऑस्ट्रेलिया संघाला काहीच लाभ होणार नाही, असे गांगुलीला वाटते. ‘ऑस्ट्रेलियाच्या युवा गोलंदाजांसाठी सचिन मास्टरच आहे. सचिनला सापळ्यात अडकवणे वाटते इतके सोपे नाही. याचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनची सरासरी 60 पेक्षा अधिकची आहे. शिवाय त्याने कांगारूंविरुद्ध 11 शतके ठोकली आहेत. सचिन आगामी मालिकेतही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खो-याने धावा काढेल,’ असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. ऑस्ट्रेलिया संघाचे सध्याचे प्रशिक्षक मिकी आॅर्थर यांच्या बोलावण्यावरून चॅपल पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी संवाद साधणार आहेत, असे वृत्त आहे. चॅपल भारतीय संघाचे प्रशिक्षक होते, त्या वेळी संघाची परिस्थिती आणि एकूणच वातावरण वेगळे होते. आताचा भारतीय संघ पूर्णत: भिन्न आहे. चॅपल यांचे सल्ले ऑस्ट्रेलियाच्या अंगलट आल्यास नवल वाटायला नको, असेही दादाने म्हटले.
  त्या मालिकेतही फायदा झाला नव्हता...
  तुम्ही जर 2008 ची मालिका बघितली तर आठवेल की त्या वेळी चॅपल ऑस्ट्रेलिया संघात सल्लागार म्हणून उपस्थित होते. मात्र, त्या वेळी सुद्धा त्यांच्या सल्ल्याचा ऑस्ट्रेलिया संघाला लाभ झाला नव्हता. आम्ही ती मालिका 2-0 ने जिंकली होती. यामुळे यंदा चॅपल काही चमत्कार करतील, असे मला मुळीच वाटत नाही, असेही गांगुलीने नमूद केले.
  प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी चुका केल्या होत्या... :
  चॅपल भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना त्यांनी कधीच भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमचे वातावरण शांत राहू दिले नाही. चॅपल एका पाठोपाठ एक चुका करीत जायचे. त्या वेळेसचा कर्णधार द्रविडलाही त्याला रोखता आले नाही. ग्रेग चॅपल यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देणे ही एक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची घोडचुकच होती, असेही या वेळी गांगुलीने म्हटले.

Trending