आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रीन्के क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत आनंदला विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बाडेन - अखेरच्या फेरीत थरारक विजय मिळवून भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने ग्रीन्के क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत आनंदचा सामना जर्मनीच्या आर्केडीज नॅडिस्च याच्याशी होता. अतिशय रोमांचक लढतीत आनंदने विरोधी खेळाडूच्या इटालीयन डिफेन्सपुढे दमदार खेळ करून बाजी मारली. बिल्बाओ येथील स्पर्धेनंतर माझ्यासमोर कसल्याच अडचणी उरल्या नव्हत्या. चांगल्या पोझिशननंतर सामना न गमावण्याचे आव्हान होते. हे आव्हान मी या स्पर्धेत यशस्वीरीत्या पेलले आहे, असे आनंदने म्हटले.