आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी कमी मारल्यामुळे खेळपट्टी ‘धोकादायक’, क्युरेटर सुधीर नाईक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी खराब खेळपट्ट्या तयार करणाऱ्या बीसीसीआयवर सर्वत्र टीका होत आहे. गतसाली आयसीसीने बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यावर नागपूरची खेळपट्टी खराब असल्याचे शिक्कामोर्तब केल्यानंतरही भारतीय क्रिकेट बोर्डाच्या धोरणात काहीही बदल झालेला दिसत नाही. कानपूरची खेळपट्टीही खराब होती, तर सौरव गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली ईडन गार्डन्स येथील दुसऱ्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी धोकादायकही होती. या खेळपट्टीने उभय संघांतील काही खेळाडूंना प्रसाद दिला. शिखर धवन फॉर्मच्या शोधात असताना त्यालाही अंगठ्यावर चेंडूचा आघात झाल्यामुळे जायबंदी व्हावे लागले. मालिकेतील पहिल्या अर्धशतकाच्या समीप आलेल्या कप्तान कोहलीला एक चेंडू ‘सरपटी’ पडला आणि खेळपट्टीच्या सुमार दर्जाचे वाभाडेच निघाले.
याबाबत भारताचे माजी कसोटीपटू व बीसीसीआयच्या पीच कमिटीचे पश्चिम विभागाचे माजी सदस्य सुधीर नाईक यांच्या मते कसोटी क्रिकेटसाठी आदर्श खेळपट्टी कोणती? तर ज्या खेळपट्टीवर, फलंदाज आणि वेगवान व फिरकी गोलंदाज यांना आपापले कौशल्य दाखविण्याची समान संधी मिळते ती उत्तम खेळपट्टी.

आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना सुधीर नाईक म्हणतात, ‘पहिल्या दिवशी ज्या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी ती फलंदाजांसाठी आदर्श असते. चौथ्या दिवसापासून ज्या खेळपट्टीवर चेंडू वळायला लागतो आणि पाचव्या दिवशी कसोटी सनसनाटी समारोपाच्या जवळ येते ती आणि अशीच खेळपट्टी कसोटीसाठी आदर्श खेळपट्टी असते. '

हा दुटप्पीपणा कशाला
बीसीसीआयने यंदापासून रणजी सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण यजमान संघ खराब खेळपट्ट्यांवरून फायदा उठवितो. हाच नियम परदेशी संघ भारतात आला की बीसीसीआय स्वत:साठी लावत नाही. हा दुटप्पीपणा आहे.

प्रश्न : खेळपट्टी खराब का होते?
नाईक : सामना सुरू झाला की, खेळपट्टीवर पाणी मारता येत नाही. उन्हामुळे खेळपट्टीतले पाणी दोन दिवसांनंतर सुकून ती कोरडी पडायला लागते. मग हळूहळू माती ढिली पडते. त्यामुळे कसोटीला आरंभ होण्याआधी खेळपट्टीला व्यवस्थित पाणी देणे आवश्यक असते. एका दिवसापासून थांबविले की ती तुटायला लागते.

प्रश्न : चेंडू पहिल्या षटकापासून वळतो ती खेळपट्टी खराब का चेंडूला अारामात उसळी मिळते ती खेळपट्टी वाईट?
नाईक : दोन्ही खेळपट्ट्या खराबच. फक्त पहिल्या चेंडूपासून फिरकीला साथ देणारी खेळपट्टी फलंदाजीसाठी आव्हानात्मक आणि अन्यायकारक ठरते तर चेंडूला असमान उसळी देणारी खेळपट्टी धोकादायक असते.

प्रश्न : यावर उपाय काय?
उत्तर : यजमान संघ खेळपट्टी तयार करण्याचा हक्क वापरू शकतो, हे जरी खरे असले तरीही खेळपट्टी तयार करताना कोणत्याही दडपणाशिवाय, आग्रहाशिवाय किंवा कुणाला खुश करण्यासाठी खेळपट्टी तयार करू नये. खेळपट्टीचे स्वरूप पाहता क्षणी लक्षात येते. म्हणजे ती कोरडी मुद्दामच ठेवण्यात आली आहे का? गवताचे काही पुंजके हिरवेगार व काही कोरडे आहेत का? यावरून खेळपट्टीचा अंदाज बांधता येतो.
बातम्या आणखी आहेत...