मनप्रीत जुनेजाचा दणका, / मनप्रीत जुनेजाचा दणका, पहिल्‍या सामन्‍यातच झळकावले द्विशतक

तुषार त्रिवेदी

Dec 17,2011 03:40:53 PM IST

अहमदाबाद- गुजरातचा युवा फलंदाज मनप्रीत जुनेजाने शुक्रवारी तामिळनाडू विरूद्धच्‍या रणजी ट्रॉफी क्रिकेट सामन्‍यात शानदार दुहेरी शतक झळकावले. त्‍याने फक्‍त द्विशतकच झळकावले नसून आपल्‍या संघाला पराभवाच्‍या गर्तेतूनही बाहेर काढले. त्‍याशिवाय स्‍वत:चे नाव रणजी क्रिकेटच्‍या इतिहासामध्‍ये देखील नोंदवले.
उल्‍लेखनीय म्‍हणजे रणजी ट्रॉफीच्‍या 77 वर्षाच्‍या इतिहासात कारकीर्दीच्‍या पहिल्‍या सामन्‍यातच दुहेरी शतक लगावणारा मनप्रीत जुनेजा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे.
सरदार पटेल स्‍टेडियममध्‍ये तामिळनाडूच्‍या 698 धावांचा पाठलाग करताना मनप्रीतने 201 धावा बनवल्‍या आणि गुजरातची धावसंख्‍या 539 करण्‍यास मदत केली.
भारतीय क्रिकेटमध्‍ये हा कारनाम आतापर्यंत तीनच खेळाडूंनी हा कारनामा केला आहे. गुंडप्‍पा विश्‍वनाथ (म्‍हैसूर), अमोल मुझूमदार (मुंबई) आणि अंशुमन पांडे (मध्‍य प्रदेश) यांनीच हा विक्रम केला आहे. यामध्‍ये आघाडीवर अमोल मुझूमदार आहे त्‍याने आपल्‍या पहिल्‍या सामन्‍यात 260 धावा बनवल्‍या होत्‍या. तो विक्रम अजूनही अबाधित आहे.

X
COMMENT