आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातकडून महाराष्ट्राचा 8 गड्यांनी पराभव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातने रविवारी पश्चिम विभाग सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा 8 गड्यांनी पराभव केला. असद पठाण (87) व मनप्रीत जुनेजा (28) यांच्या नाबाद फलंदाजीच्या बळावर गुजरातने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 8 बाद 147 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमानांनी दोन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

धावांचा पाठलाग करणार्‍या गुजरातच्या असद पठाण व कर्णधार पार्थिव पटेल या जोडीने पहिल्या गड्यासाठी 26 धावांची भागीदारी केली. दरम्यान, पार्थिव पटेलला (18) समद फल्लाहने केदार जाधवकरवी झेलबाद केले. तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या नीरज पटेलने सलामीवीर असदसोबत दुसर्‍या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. नीरजने 25 चेंडूत तीन चौकारांसह 28 धावा काढल्या. फल्लाहने नीरजला पायचीत केले. देवधर ट्रॉफी विजेत्या टीममधील मनप्रीत जुनेजाने असदसोबत 36 धावांची भागीदारी करून गुजरातला विजय मिळवून दिला. असदने 44 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकार ठोकून नाबाद 87 धावा काढल्या. तत्पूर्वी, महाराष्ट्राकडून निखिल नाईकने (52) शानदार अर्धशतक ठोकले. तसेच विजय झोल (23), निखिल नाईक (52), प्रयाग भाटी (30*), केदार जाधव 19 धावा केल्या.