आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gurupreeti Singh Entered In Standard Pistool Final, Asian Games

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुप्रीत सिंग २५ मी. स्टँडर्ड पिस्तूलच्या फायनलमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - युवा नेमबाज शगुन चौधरी, श्रेयसी सिंग आणि वर्षा वर्मन यांनी इंचियोन एशियाड स्पर्धेच्या सहाव्या दिवशी गुरुवारी शानदार कामगिरी करताना महिलांच्या डबल ट्रॅप टीम स्पर्धेच्या फायनल्समध्ये कांस्यपदक जिंकले. भारताने महिलांच्या डबल ट्रॅप टीम फायनल स्पर्धेत एकूण २७९ गुण मिळवले. यजमान दक्षिण कोरियाने ३१४ गुणांसह रौप्यपदक तर चीनने ३१५ गुणांसह सुवर्णपदक मिळवले.

गुरप्रीत फायनलमध्ये : भारताच्या गुरप्रीत सिंगने पुरुषांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल स्पर्धेत ५७० गुण मिळवत पाचवे स्थान मिळवले. यासह त्याने फायनलमध्ये प्रवेश केला. चीनच्या जिन योंगदेनेसुद्धा ५७० गुण मिळवले. मात्र, त्याने भारतीय खेळाडूच्या १४ टेनच्या तुलनेत १० टेनचा स्कोअर केला. सांघिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. भारताने सांघिक स्पर्धेत १६८४ गुण मिळवत पाचवे स्थान मिळवले.

भारतीय संघ चौथ्या स्थानी
भारताचा गगन नारंग, जयदीप करमाकर आणि हरिओम सिंग यांनी पुरुषांच्या ५० मीटर प्रोन टीम फायनलमध्ये सुमार कामगिरी केल्याने भारताला चौथ्या स्थानावर समाधाने मानावे लागले. भारतीय संघाने एकूण १८५२.०० चा स्कोअर केला. या स्पर्धेत कजाकिस्तानने कांस्यपदक तर यजमान दक्षिण कोरियाने रौप्य आणि चीनने सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी कामगिरी निराशाजनकच राहिली. वैयक्तिक प्रकारात भारतीय नेमबाजांना फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले.