आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेसात फूट उंच बास्केटबॉलपटूला लागतात २२ नंबरचे जोडे, ५ फुटी पँट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - बास्केटबॉलपटू गुरुसिमसिंह भुल्लरला मैदानावर फार उंच उडी घ्यावी लागत नाही. त्याचा चेंडू सहजतेने बास्केटमध्ये पडतो. कारण आहे त्याची उंची. गुरूसिमची उंची आहे ७ फूट ५ इंच. त्याला २२ नंबरचे बूट, चप्पल लागतात व ते ऑर्डर देऊनच बनवून घ्यावे लागतात. सिम अमेरिकेत राहतो, परंतु त्याच्यासाठी अमृतसरमध्ये तयार झालेले पँट, थ्री पीस सूटच वापरतो. तोदेखील ऑर्डरनुसार शिवून घेतलेले (कारण रेडिमेड साइजचे मिळतच नाहीत). येथील चोपडा डिझायनर्सचे मालक नीलम राॅय चोपडा व बिमल रॉय चोपडा यांनी सिम भुल्लरच्या पँटचे माप कटआऊट करूनच ठेवले आहे. सिम भुल्लरला पाच फूट उंचीची पँट लागते. त्यांनी सिमच्या मापाचे १२ सूट शिवून पाठवले आहेत.