पानेमबंग - गत २०१० यूथ ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता एच. प्रणय रविवारी इंडोनेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचा चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचा किताब पटकावला. भारताच्या युवा खेळाडूने अंतिम सामन्यात यजमान इंडोनेशियाच्या िफरमन अब्दुल खाेलिकचा सरळ दाेन गेममध्ये पराभव केला. पाचव्या मानांकित प्रणयने अवघ्या ४३ मिनिटांमध्ये २१-११, २२-२० अशा फरकाने सामना जिंकला.
गत आठवड्यात भारताच्या प्रणयने व्हिएतनाम आेपन बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले हाेते. त्यानंतर आठवडाभरात भारताच्या या युवा खेळाडूने एकेरीचा किताब जिंकला.
दमदार सुरुवात करताना २२ वर्षीय प्रणयने पहिल्या गेममध्ये ६-२ ने आघाडी मिळवली. त्यानंतर त्याने
आपला दबदबा कायम ठेवत पहिला गेम आपल्या नावे करून लढतीत आघाडी घेतली. त्यापाठाेपाठ त्याने दुसऱ्या गेममध्येही दमदार खेळीची लय कायम ठेवली. या वेळी फिरमनने घरच्या मैदानावर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने दुसऱ्या गेममध्ये शर्थीची झुंज दिली. मात्र, अवघ्या दाेन गुणांच्या आघाडीने पाचव्या मानांकित प्रणयने दुसरा गेम जिंकून िफरमनचा पराभव केला. त्यामुळे यजमान संघाच्या खेळाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आंद्रिन्ती महिला गटात विजेती
इंडाेनेशियाची आंद्रिन्ती फिरडाेस्सारीने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात आपली सहकारी रुस्सेलीचा ३३ मिनिटांत पराभव केला. तिसऱ्या मानांकित आंद्रिन्तीने २१-१४, २१-१४ ने सामन्यात विजय मिळवला.
प्रणयला १,२५,०००
डाॅलरचे बक्षीस
भारताच्या युवा खेळाडूला विजेतेपद जिंकल्यानंतर १ लाख २५ हजार डाॅलर आणि ट्राॅफी देऊन गाैरवण्यात आले. गत आठवड्यात ताे व्हिएतनाम आेपनमध्ये ५०,००० डाॅलरचा मानकरी ठरला हाेता.