आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hafthor Bjornsson Winning Europe\'s Strongest Man, News In Marathi

VIDEO: युरोपमधील सर्वांत शक्‍तिशाली मनुष्‍य, स्‍वत:ला समजतो \'दगडाहूनही मजबूत\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - 'युरोप स्ट्रॉंगेस्ट मॅन' स्‍पर्धेत भाग घेताना हॉफथोर जॉर्नसन)
न्‍यूयॉर्क - 'यूरोप स्ट्रॉंगेस्ट मॅन' चा किताब पटाकाविणा-या हॉफथोर जॉर्नसने स्‍वत:ला शक्‍तीशाली संबोधले आहे. एवढेच नाहीत आपले शरीर दगडाहूनही कठीण असल्‍याचे त्‍याने सांगितले.
6 फुट 9 इंच महाकाय शरीर असलेला हॉफथोर जॉर्नसनने म्‍हटले आहे की,''मला वाटते मी युरोपचाच नाही तर संपूर्ण विश्‍वातील सर्वांधीक शक्‍तीशाली मणुष्‍य आहे. गेल्‍या काही वर्षांपासून अथक मेहनतीने मी हे शरीर कमविले आहे.''
काय आहे 'युरोप स्ट्रॉंगेस्ट मॅन' स्‍पर्धा ?
'युरोप स्ट्रॉंगेस्ट मॅन' ही स्‍पर्धा युरोपमध्‍ये दरवर्षी आयोजित केली जाते. ज्‍यामध्‍ये सामान्‍यता युरोपधील लोक सहभागी होतात. या स्‍पर्धेमध्‍ये बेंच प्रेस, वेट रनिंग(वजन घेवून 100 मीटर धावणे), गोळा फेक(गोळ्याची साईज मोठी असते.) तसेच बॉडीबिल्डिंगशी जुळलेले अनेक खेळ असतात.
हॉफथोरने उचलले 450 किलो वजन
हॉफथोर जॉर्नसन 450 किलोपेक्षा जास्‍त वजन उचलण्‍यास सक्षम आहे. उल्‍लेखनिय म्‍हणजे हॉफथोर सध्‍या 25 वर्षांचा आहे. भविष्‍यात तो आणखी शक्‍तीशाली बनू शकतो.
वजन उचलण्‍याच्‍या स्‍पर्धेतील प्रकार
* स्क्वॉट (वजन ला खांद्यावर घेवून उठबशा माराव्‍या लागतात) : 350 किलो (770 पाउंड)
* बेंच प्रेस (पाठीवर झोपून वजन उचलने) : 230 किलो (507 पाउंड)
* टायर डेडिफ्ट : 450 किलो (994 पाउंड)
* डेडिफ्ट (रॉडला वजन लावून उचलले) : 420 किलो (925 पाउंड)
* लॉगिफ्ट : 190 किलो (424 पाउंड)
प्रशिक्षणादरम्‍यान
* डेडिफ्ट : 410 किलो (903.8 पाउंड)
* लॉगिफ्ट : 190 किलो (418.8 पाउंड)
पुढील स्‍लाइडवर पाहा, हॉफथोरची काही निवडक छायाचित्रे आणि VIDEO (अंतीम स्‍लाइडमध्‍ये)