आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुद्द बुकीजनीच केला होता पोलिसांसमोर मॅच फिक्सिंगचा भंडाफोड ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेरा वर्षांनंतर मॅच फिक्सिंगचा खटला पुन्‍हा एकदा उघडण्‍यात आला आहे. आयपीएल स्‍पॉट फिक्सिंगनंतर झोपेतून जागे झालेल्‍या दिल्‍ली पोलिसांनी ट्रायल कोर्टात शेवटी चार्जशीट फाईल केली. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्‍सी क्रोनिएने मॅच फिक्सिंगसाठी 1.2 कोटी रूपये घेतल्‍याचा दावा दिल्‍ली पोलिसांनी आपल्‍या आरोप पत्रात केला आहे. या आरोपपत्रात क्रोनिए एकमेव क्रिकेटपटू आहे.

वर्ष 2000मध्‍ये दक्षिण आफ्रिकेचा तत्‍कालीन कर्णधार क्रोनिएने किंग कमिशनसमोर आपला गुन्‍हा कबूल केला होता. त्‍यावेळी त्‍याच्‍या कबुलीनाम्‍यामुळे क्रिकेट विश्‍वात मोठी खळबळ उडाली होती. क्रोनिएबरोबर दक्षिण आफ्रिकेचे इतर खेळाडू निकी बोए, हर्षेल गिब्‍ज आणि हेन्‍री विलियम्‍स यांच्‍या नावाचाही समावेश होता. इतकेच नव्‍हे तर टीम इंडियाचा तत्‍कालीन कर्णधार मोहम्‍मद अझरूद्दीनवरही फिक्सिंगचा आरोप लावण्‍यात आला होता.

काळाप्रमाणे हे प्रकरणही थंड बस्‍त्‍यात जाऊन पडले. हेलिकॉप्टर दुर्घटनेत क्रोनिएचा मृत्‍यू झाल्‍यानंतर हळूहळू एक-एक आरोपी निर्दोष सुटू लागला. जवळजवळ सर्वांना क्लिन चीट मिळाल्‍यानंतर पुन्‍हा एकदा क्रिकेट पूर्वपदावर आले. परंतु, हे प्रकरण इतके सरळ असेल असे तुम्‍हाला वाटते काय ? तथ्‍ये पडताळून पाहिल्‍यास लक्षात येईल की इथे काही तरी मुरतयं.

दिल्‍ली पोलिसांनी यावेळी एक साक्षीदारही समोर आणला आहे. हा साक्षीदार मुंबईतील एका मोठया हॉटेलमध्‍ये हाऊसकिपिंगचे काम करत होता. क्रोनिए सट्टेबाज संजीव चावलाच्‍या खोलीत रिकाम्‍या हाताने गेला आणि बाहेर येताना त्‍याच्‍या हातात बॅग होती, असे त्‍याने आपल्‍या जबानीत म्‍हटले आहे. 93 पृष्‍ठांच्‍या या आरोपपत्रात सहा लोकांचे नाव आहे. क्रोनिएचे नाव आरोपपत्रातील कॉलम दोनमध्‍ये दिले आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्‍या चार्जशीटच्‍या मते, क्रोनिएच फिक्सिंगप्रकरणी दोषी आहेत. त्‍याने एकटयानेच मॅच फिक्‍स केले असून त्‍यातून त्‍याने कोट्यवधी रूपये कमावले होते. एवढया मोठया रॅकेटमध्‍ये फक्‍त एका खेळाडूचे नाव येणे खरच अचंबित करण्‍यासारखे आहे.

पोलिसांच्‍या चार्जशीटमुळे निर्माण झाले आहेत काही प्रश्‍न. जे समोर आले तेच सत्‍य आहे, कि हे प्रकरण काही वेगळे आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या मॅच फिक्सिंग प्रकरणाची काही न उलगडलेले प्रश्‍न...