आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hansie Cronje's Father Threatens Legal Action Against Indian Police

क्रोनिएचे वडील म्‍हणतात, 'मॅच फिक्सिंग दोषारोपात अर्थ नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए याच्यावर आता त्याच्या निधनानंतर दोषारोप करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या भूमिकेत काहीच तथ्य दिसत नसल्याचे हॅन्सीचे वडील एवी क्रोनिए यांनी म्हटले आहे. तेरा वर्षांपूर्वीच्या मॅच फिक्सिंगबाबतच्या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांनी हॅन्सीवर दोषारोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

तो असताना त्याच्यावर गुन्हा दाखल करूनही दिल्ली पोलिसांना त्यातून काहीच गवसले नव्हते, मग आता तो हयात नसताना त्यांना काय सापडणार आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.