जगातील स्टार टेनिसपटूमध्ये गणल्या गेलेली अन्ना कुर्निकोवा आज 33 वर्षांची झाली आहे. जागतिक मानांकनात 8 व्या स्थानापर्यंत ती पोहोचली होती. तेव्हा झालेल्या दुखापतीमुळे तीचे करिअर संपुष्टात आले.
अन्ना कुर्निकोवा या रशियन टेनिपटूचा जन्म 7 जून 1981 मध्ये झाला. केवळ पाच वर्षांची असतानाच तिने टेनिस खेळायला सुरुवात केली होती. तिच्या ग्लॅमरस छबीने ती लवकरच लोकप्रिय झाली होती. तिने करिअमध्ये एकही किताब न मिळवता ती टॉप टेनिसपटुंच्या लोकप्रियतेते जावून बसली होती.
मार्टीना हिंगीसला केले जोडीदार
अन्नाने सर्वांधीक यशस्वी राहिलेली आणि अग्रमानांकीत मार्टीना हिंगीसला जोडीदार बनवून 1999 आणि 2002 मध्ये दुहेरीतील किताब जिंकला होता. तेव्हापासून या जोडीला टेनिसविश्वातील स्पाईस जोडी असे संबोधले जायचे.
फिटनेसच्या कारणामुळे अन्नाला टेनिसमधून संन्यास घ्यावा लागला होता. दुखापतीमुळे तिचे करिअर संपुष्टात आले.
अन्नाने वयाच्या 14 व्या वर्षांपासून व्यावसायिक टेनिस खेळायला सुरुवात केली. रशियाच्या फेडकपमध्ये भाग घेताच विजय संपादन करणारी ती सर्वांत लहान वयाची टेनिसटू ठरली होती. आजही रशियामध्ये तिची गणना टॉपच्या टेनिसपटूमध्ये केली जाते.
पुढील स्लाइडवर पाहा, अन्ना कुर्नीकोवाची ग्लॅमरस छायाचित्रे...