आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harbhajan Can Make A Comeback To Indian Team: Sourav Ganguly

हरभजनला डावलले; गांगुलीचे धोनीवर टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - भारताचा आघाडीचा ऑफस्पिनर हरभजनसिंग अजूनही टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, असे मत माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे. सध्या हरभजन संघाबाहेर असला तरीही देशांतर्गत क्रिकेट स्पध्रेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. निवड समितीने कर्णधार धोनीच्या मर्जीतील खेळाडूंशिवाय इतरांचाही विचार केला पाहिजे, असा टोला ‘दादा’ने दिला.

‘भज्जी अजूनही राष्ट्रीय संघात पुनरागमन करू शकतो, असे मला वाटते. तो खेळाच्या दोन्ही स्वरूपात खेळण्यास सक्षम आहे,’ असे गांगुलीने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. हरभजन अजूनही देशातला अव्वल फिरकीपटू असून, धोनीच्या र्मजीबाहेर जाऊन खेळाडू निवडण्याचे धाडस निवड समितीत नसल्याचे गांगुलीला वाटते.

हरभजनसिंगने सहा रणजी सामन्यांत खेळताना 26.60 च्या सरासरीने 23 गडी बाद केले. रणजीत इतकी चांगली कामगिरी असताना त्याची आशिया चषक किंवा वर्ल्डकप टी-20 साठी निवड न झाल्याने गांगुलीने आश्चर्य व्यक्त केले.

भज्जी व प्रज्ञान ओझाच्या जागी आशिया चषक व वर्ल्डकपसाठी अमित मिर्शाला दिलेली संधी गांगुलीला योग्य वाटत नाही. मिर्शा हा सरासरी दर्जाचा फिरकीपटू असून त्याचा चेंडू हवेत फिरतो व फलंदाज त्याचा अंदाज घेऊ शकतो. तो संथगतीचा गोलंदाज असून, त्याच्याविरुद्ध धावा काढणे सोपे काम आहे. त्यामुळे त्याच्या जागी हरभजनसिंग संघात हवा होता, असे गांगुलीने म्हटले.

मिश्राची निवड आश्चर्यकारक
अमित मिश्राचे क्षेत्ररक्षण अत्यंत सुमार दर्जाचे आहे. हरभजन किंवा ओझाच्या जागी त्याची निवड करण्याचा निर्णय सर्मथनीय नाही. त्या समावेशात भारतीय संघात काही बदल होईल असे मला वाटत नाही. बांगलादेशातील खेळपट्टय़ा सपाट असून, त्यावर मिश्रा कितपत प्रभावी ठरतो, हे सांगणे कठीण आहे, असे दादाने नमूद केले.