आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harbhajan Matched Shikhar Dhawan Love Life With Aesha

PHOTOS: शिखर धवन आणि त्‍याचे लव्‍ह लाईफ !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर अश्विन, कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्‍याप्रमाणे दिल्‍लीचा दमदार फलंदाज शिखर धवनलाही लेडी लकचा अनुभव आला आहे. गेल्‍यावर्षी ऑस्‍ट्रेलियामध्‍ये राहणा-या आयेशा मुखर्जीबरोबर धवनचे लग्‍न झाले. लग्‍न होताच त्‍याच्‍या क्रिकेट करिअरला वेग मिळाल्‍याचे दिसते.

गेल्‍या काही महिन्‍यांपासून सातत्‍यपूर्ण कामगिरीचा शिखरला फायदा झाला. आगामी ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या कसोटी मालिकेतील पहिल्‍या दोन कसोटीसाठी त्‍याची संघात निवड करण्‍यात आली. कमालीचा फॉर्मात असलेला सुरेश रैना आणि युवराज सिंगसारख्‍या दिग्‍गज फलंदाजांना मागे टाकत त्‍याने निवडसमितीला प्रभावीत केले.

दिल्‍लीचा रहिवासी असलेल्‍या शिखरची लव्‍ह स्‍टोरीही थोडीशी हटके आहे. आयेशाची आणि त्‍याची भेट होणे हा एक योगायोगच होता. या 'मॅच फिक्सिंग' चा सूत्रधार होता स्‍टार फिरकीपटू हरभजन सिंग. भज्‍जी आयेशा आणि शिखरचा कॉमन मित्र आहे. हरभजनच्‍या मदतीनेच या दोघांची पहिल्‍यांदा भेट झाली होती. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या टीम इंडियाचा नवा स्‍टार फलंदाज शिखर धवनची लव्‍ह स्‍टोरीविषयी...