आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धोनी ब्रिगेडने घ्‍यावा भज्‍जीचा आदर्श, आता कृतीचीही अपेक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने चॅम्पियन्‍स ट्रॉफीचे जेतेपद पटकावून इतिहास निर्माण केला. धोनीच्‍या यंग ब्रिगेडने आपला हा विजय उत्तराखंडमधील पुराचा तडाखा बसलेल्‍या लोकांना स‍मर्पित केला. यात आघाडीवर होता टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज शिखर धवन. पण सध्‍या टीम बाहेर असलेल्‍या फिरकीपटू हरभजन सिंगने धवनच्‍याही एक पाऊल पुढे टाकले आहे. त्‍याने पीडित लोकांबद्दल फक्‍त सहानभूती न दाखवता प्रत्‍यक्ष दहा लाख रूपयांची मदत देणार असल्‍याची घोषणाही केली.

उत्तराखंडमधील या भीषण घटनेनंतर उद्धवस्‍त झालेले जनजीवन सुर‍ळीत करण्‍यासाठी मोठया रकमेची गरज आहे. अशावेळी धोनी ब्रिगेडने भज्‍जीच्‍या पावलावर पाऊल टाकून उत्तराखंडला विजय समर्पित करून जी संवेदनशीलता जाहीर केली ती त्‍यांनी सिद्धही करून दाखवावी.

निश्चितपणे धोनी ब्रिगेड अशी मदत करून खेळाची उंची आणखीन वाढवेल. इतकेच नव्‍हे तर खेळाडूंना एक-एक कोटी रूपये देणा-या जगातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळला (बीसीसीआय) असे उदाहरण देण्‍याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वीही क्रिकेटपटू आणि बीसीसीआयने आपत्तकालीन परिस्थितीत अशा पद्धतीची मदत केली आहे.

फोटोंच्‍या माध्‍यमातून पाहा यापूर्वी अशा दुर्दैवी घटनेवेळी कशापद्धतीने क्रिकेटपटूंनी दाखवले त्‍यांचे मोठे मन...