आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच बरा होऊन मैदानात उतरेन : भज्जी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जखमी असल्यामुळे तीन आठवडे दवाखान्यात उपचार घेत होतो. त्यामुळे मागील काही दिवसांत क्रिकेटला खूप मिस करत आहे. लवकरच मी तंदुरुस्त होऊन मैदानात उतरेन व चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, असे मत क्रिकेटपटू हरभजनसिंग याने गुरुवारी व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी पुण्यात आला असताना तो पत्रकारांशी बोलत होता.
हरभजन म्हणाला, क्रिकेट सराव करण्यास मी सुरुवात केली असून प्रशिक्षकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार मी दररोज चार तास बोलिंग व रनिंगचा सराव करत आहे. तिरंगा असलेले टी शर्ट घालून मैदानात उतरणे हे इतर सर्व गोष्टींपेक्षा मला महत्त्वाचे वाटते. संघातील इतर खेळाडूंच्या दुखापतीविषयी मी काही सांगू शकत नाही, पण खेळताना दुखापती होत असतात, त्यातून लवकर बरे होऊन मैदानावर येणे महत्त्वाचे असते.