Home »Sports »From The Field» Harbhajan Singh In Playing 11 For Chennai Test

हरभजन खेळणार चेन्नई कसोटी; 'शतक' साजरे करणार

दिव्य मराठी वेब टीम | Feb 21, 2013, 14:25 PM IST

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगला 22 फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या चेन्नईतील पहिल्या कसोटीत 11 जणांच्या संघात स्थान मिळाले आहे. हरभजनच्या करिअरमधील हा शंभरावा कसोटी सामना असेल. हरभजनची 100 वी कसोटी असल्याने त्याला चेन्‍नई कसोटीत स्थान मिळेल की नाही याबाबत उत्सुकता होती.

ऑस्ट्रेलियाने भारताविरोधात उद्यापासून सुरु होत असलेल्या पहिल्या कसोटीसाठी दोन दिवस आधीच 11 जणांचा संघ जाहीर केला आहे. त्यात कांगारुंनी चार वेगवान गोलंदाजांना तर एका स्पिनराला संघात स्थान दिले आहे. आयपीएल-6 साठी सगळ्यात महाग ठरलेला ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल चेन्नईतील कसोटीत पदार्पण करु शकणार नाही. त्याला 12 खेळाडू बनवले आहे. मॅक्सवेलच्या जागेवर संघात वेगवान गोलंदाज मोझेस हेनरिक्सला स्थान मिळाले आहे.

Next Article

Recommended