आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harbhajan Singh News In Marathi, Cricket, Ravichandra Ashwin

हरभजनची कबुली: अश्विनशी नव्हे, स्वत:शीच स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विदेशात रविचंद्रन अश्विनच्या सर्वसाधारण कामगिरीमुळे हरभजनच्या संघातील परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, संघातील जागेसाठी माझी अश्विनशी नव्हे, तर स्वत:शीच स्पर्धा असल्याचे हरभजनने नमूद केले.


माझ्या संपूर्ण कारकीर्दीत नेहमी मीच स्वत:चा स्पर्धक राहिलो आहे. मी कधीच कुणाशी स्पर्धा केली नाही. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअर हा एकेकट्याचा मार्ग असतो. त्यात ज्याला त्याला स्वत:शीच स्पर्धा करीत खेळाडू म्हणून विकास साधून घ्यावा लागतो, असेही हरभजनने नमूद केले. अश्विनच्या खराब कामगिरीनंतर मनिंदरसिंग आणि नरेंद्र हिरवाणी यांनी त्याला फटकारले असून माजी कप्तान गांगुलीने तर हरभजनला पुन्हा संघात घेण्याची मागणी केली आहे. शंभरहून अधिक कसोटी आणि सव्वादोनशेपेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळून स्वत:ला सिद्ध करणे अवघडच असते. मात्र, मी परिस्थितीचा सामना करणारा असल्याचेही हरभजनने नमूद केले.