Home | Sports | From The Field | harbhajan singh wants indian team captaincy

हरभजनची इच्छा भारतीय संघाचा कर्णधार होण्याची

Agency | Update - Jun 01, 2011, 11:22 AM IST

भारतीय संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आपल्यासा भारतीय संघाचा कर्णधार होण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे.

  • harbhajan singh wants indian team captaincy

    harbhajansingh_258मुंबई - भारतीय संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आपल्यासा भारतीय संघाचा कर्णधार होण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे.

    वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातून अनेक वरिष्ठ खेळाडूंना माघार घेतली आहे. सुरवातीला गंभीरला कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, त्याला दुखापत झाल्याने संघाचे नेतृत्व सुरेश रैनाकडे देण्यात आले. भारतीय संघाचा कर्णधार बनणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि तेच हरभजन सिंग यानेही बोलून दाखविले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरभजन म्हणाला, संघातील प्रत्येक वरिष्ठ खेळाडू नवीन खेळाडूंना शिकविण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे मी संघातील नवख्या खेळाडूंना उप-कर्णधार या नात्याने योग्य मार्गदर्शन करेल.Trending