आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभजन सिंग करणार चित्रपट सृष्‍टीत प्रवेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू हरभजनसिंगचे नाव लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. भारतीय संघामध्ये पुनरागमनाचा प्रयत्न करत असलेल्या या स्टार क्रिकेटपटूने आता चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला आहे. तो लवकरच दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहे. यामध्ये विनोदी व रोमँटिक चित्रपटांचा समावेश आहे.

‘बॉलीवूडमधील अनेक स्टार अभिनेते व पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील काही लोकांसोबत चित्रपट तयार करण्याविषयी चर्चा करत आहे. दोन चित्रपटांसाठी मी दोन सहदिग्दर्शकांचीदेखील निवड केली आहे, असे हरभजनने सांगितले.
ज्वाला गुट्टा तेलगू चित्रपटात : स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आता लवकरच तेलगू चित्रपटात झळकणार आहे. गालानथायिंडेच्या एका गाण्यात ती नृत्य करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरणदेखील सुरू झाले आहे. चित्रपटातील अभिनेता हा ज्वालाचा जवळचा मित्र आहे.

‘नितीन व चित्रपट निर्माता माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला या गाण्याविषयी सांगितले. आधी मला ही गंमत वाटली. मात्र, गाणे ऐकल्यानंतर मी चित्रपटात नशीब अजमावण्याचा विचार केला. एकदाच जीवन मिळते. यामध्ये नवीन काही तरी करण्यासाठी प्रयत्न करण्यास इच्छुक आहे. पहिल्या दिवशी शूटिंगच्या वेळी मी फार नाराज होते. सेटवर अनेक लोक होते. या वेळचा अनुभव फार वेगळा होता. मला डान्सच्या स्टेप शिकण्यासाठी तब्बल आठवडा लागला,’ असेही ज्वालाने सांगितले.

दोन चित्रपटांची तयारी
विनोदी व रोमँटिक असे दोन चित्रपट मी बनवत आहे. माझ्या मते, चित्रपट क्षेत्रात पैसा आहे. यासाठी मी पंजाबी चित्रपटांत नशीब अजमावण्याचा विचार करत आहे, असेही ‘सन ऑ फ सरदार’ म्हणाला.