आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haroon Logart Should Be Beg Pardon Jagmohan Dalmiya

हारून लोर्गट यांनी बीसीसीआयची माफी मागावी - जगमोहन दालमिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे (सीएसए) प्रमुख हारून लोर्गट यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. लोर्गट यांनी दोन्ही क्रिकेट मंडळात वितुष्ट आणल्याचा आरोप बीसीसीआयने केला असून त्यांनी माफी मागावी अशा शब्दात बोर्डाचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी गुरुवारी लोर्गट यांना सुनावले.


सहा आठवड्यांपूर्वी द.आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताच लोर्गट यांनीही बीसीसीआयच्या कोणत्याही सदस्याची माफी मागायला आपली काहीच हरकत नसल्याचे म्हटले होते. बीसीसीआयने लोर्गट यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. लोर्गट आयसीसीचे मुख्य कार्यकारी असतानाच त्यांचे बीसीसीआयशी अनेक मुद्यांवर मतभेद होते. बीसीसीआयने आयसीसीवर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


दालमिया म्हणाले, वर्षअखेर प्रस्तावीत दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत कोणताही, कसलाही विरोधाभास नाही. तत्पूर्वी, बीसीसीआयपासून अलिप्त असलेल्या एन.श्रीनिवासन यांनीही मुंबईतल्या बैठकीत दक्षिण आफ्रिका दौरा वेळापत्रकात असल्याचे सांगितले होते. भारतीय संघ आफ्रिका दौ-यात 3 कसोटी, 7 एकदिवसीय सामने खेळणार आहे. मात्र या मालिकेतील सामने कमी करण्याचा बीसीसीआयचा इरादा असल्याचेही वृत्त आहे.मात्र, या मुद्यावर दोन्ही क्रिकेट मंडळात अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही. बीसीसीआय दक्षिण आफ्रिका दौ-याशिवाय आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदींवरील आजीवन बंदीसंदर्भआत 25 सप्टेंबरला होणा-या वार्षिक बैठकीत निर्णय घेऊ शकते.