आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Harsh Goenka Compares MS Dhoni, Steve Smith Combination To Bollywood Pair Of Jai Veeru

धोनी-स्मिथची जोडी जय-वीरूसारखी- हर्ष गोयंका, मात्र धोनीच्या चाहत्यांनी उडवली टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- आयपीएल-१०ची उपविजेता टीम रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांचे भाऊ हर्ष गोयंका यांनी संघातील दोन प्रमुख खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार स्टीवन स्मिथ यांची हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध जोडी जय-वीरूशी तुलना केली आहे. गोयंका यांनी धोनीची स्तुती केली असली तरीही टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांची टर उडवली. 
 
कर्णधार स्मिथने फायनलमध्ये अर्धशतक ठोकले. अर्धशतक ठोकूनही तो पुण्याला विजय मिळवून देऊ शकला नाही. यानंतर हर्ष गोयंका यांनी टि्वट केले की, 'शानदार प्रदर्शन, लाजवाब प्रदर्शन.. धोनी-स्मिथ म्हणजे जय-वीरू..' विशेष म्हणजे बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी अभिनय केलेली जय-वीरूची जोडी लोकांच्या अजूनही स्मरणात आहे. पुण्याचे सहमालक हर्ष गोयंका आपल्या टि्वटमुळे संपूर्ण स्पर्धेदरम्यान चर्चेत होते. याआधी त्यांनी धोनीवर टीका करताना स्मिथला जंगलाचा राजा म्हटले होते. यानंतर धोनीच्या चाहत्यांच्या रागाला त्यांना सामोरे जावे लागले. या सामन्यात स्मिथच्या जागी धोनी असता तर तो सामना संपवून आला असता. स्मिथ नव्हे, तर धोनीच खरा फिनिशर आहे, असे चाहत्यांनी सांगितले. 
 
अखेरच्या षटकात धोनी असता तर त्याने सामना जिंकून दिला असता, असे एका चाहत्याने सांगितले. एका चाहत्याने तर स्मिथ अखेरच्या षटकात बाद झाल्यामुळे गोयंका यांच्या जंगलातील राजासाठी मिनिटे मौन बाळगू या..असे उपहासात्मक पोस्ट केले. या पोस्ट त्या चाहत्याने एक फोटोही पोस्ट केला. यात बराक ओबामासह काही जण मौन ठेवत असल्याचे दिसत आहे. 
बातम्या आणखी आहेत...