आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hashim Amla On Top At Icc One Day And Kasoty Ranking

आयसीसीच्या एकदिवसीय व कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत हाशिम आमला अव्वल स्थानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला क्रिकेटचा बादशहा बनला आहे. आयसीसीच्या एकदिवसीय व कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत तो अव्वल स्थानी विराजमान झाला. दोन फॉर्मेटचे सिंहासन मिळवणारा तो दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी, रिकी पाँटिंगने ही उल्लेखनीय कामगिरी केली होती. क्रिकेटचा किंग आमलाने करिअरमध्ये पहिल्यांदा कसोटीत नंबर वनचे स्थान पटकावले आहे. तो जोहान्सबर्ग कसोटीपूर्वी ऑ स्ट्रेलियाचा मायकल क्लार्कपेक्षा एका गुणाने मागे होता. त्याने पहिल्या कसोटीत 37 व नाबाद 74 धावा काढल्या. आता त्याने करिअरमधील सर्वोत्कृष्ट 895 रेटिंग गुण मिळवले आहेत.

कसोटीतील टॉप-10 फलंदाज
क्र. फलंदाज संघ गुण
1 हाशिम आमला द. आफ्रिका 895
2 मायकल क्लार्क ऑस्ट्रेलिया 887
3 एस. चंद्रपॉल वेस्ट इंडीज 879
4 एल्बी डिव्हिलर्स द. आफ्रिका 844
5 कुमार संगकारा श्रीलंका 842
6 अ‍ॅलेस्टर कुक इंग्लंड 836
7 जॅक कॅलिस द. आफिक्रा 794
8 रॉस टेलर न्यूझीलंड 769
9 केविन पीटरसन इंग्लंड 759
10 मिसबाह पाकिस्तान 733

कसोटीतील टॉप-10 गोलंदाज
क्र. गोलंदाज संघ गुण
1 डेल स्टेन द. आफ्रिका 908
2 फिलेंडर द. आफ्रिका 857
3 रंगना हेराथ श्रीलंका 809
4 पीटर सिडल ऑस्ट्रेलिया 800
5 सईद अजमल पाकिस्तान 789
6 जेस अँडरसन इंग्लंड 759
7 ग्रीम स्वान इंग्लंड 755
8 प्रग्यान ओझा भारत 739
9 एम. मोर्केल द. आफ्रिका 722
10 हिल्फेनहॉस ऑस्ट्रेलिया 721