आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात युवराज सिंग- हेजल कीच विवाहबंधनात अडकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंग आणि हेजल कीच - Divya Marathi
युवराज सिंग आणि हेजल कीच
नवी दिल्ली- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि सिक्सर किंग नावाने प्रसिद्ध असलेला युवराजसिंग येत्या डिसेंबरमध्ये आपली प्रेमिका हेजल कीचसोबत विवाहबद्ध होणार आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार युवराजने म्हटले की, विवाह डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. लग्नात परिवार जवळचे मित्र सहभागी होतील.
युवराजची आई शबनम सिंग म्हणाल्या की, युवराजची जन्मतारीख 12 डिसेंबर असून तीच तारीख लग्नाची असू शकते. पारंपरिक पंजाबी पद्धतीने होणारा विवाह दुबईमध्ये आणि दिल्लीत स्वागत सोहळा होईल.
हेजलची आई उत्तर प्रदेशमधील आहे. त्यामुळे तेथील रितीरिवाजानुसार लग्नसोहळा पार पडेल. हेजल आणि युवराज मागील दोन वर्षापासून एकमेंकाना डेट करीत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.
कोण आहे हेजल कोच?
एसेक्स, इंग्लंडमध्ये जन्मलेली हेजल अनेक टीव्ही शोज दिसून येते. मात्र, तिला ओळख मिळाली ती सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' फिल्ममुळे. यात हेजल करीना कपूरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत चमकली होती. यानंतर ती 'मॅक्सिमम' मधील आयटम नंबर 'आ आंटे अमलापुरम' मुळे प्रसिद्धीझोतात आली होती. ती 'बिग बॉस' च्या 7 व्या सीजनमध्ये सहभागी झाली होती.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, युवराज-हेजलची निवडक छायाचित्रे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...