आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HC Grants Interim Stay On Order Restraining Pawar From Acting As MCA President

एमसीए निवडणूकप्रकरणी शरद पवारांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत अध्यक्ष शरद पवारांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. शरद पवारांना एमसीएच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारण्यास मुंबई सत्र न्यायालयाने मनाई केली होती. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या लढाईत अर्ज फेटाळण्यात आलेले उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले होते. त्या आदेशाला स्थगिती देण्‍याच्‍या उच्च न्यायालयाच्‍या आदेशामुळे शरद पवारांना दिलासा मिळाली आहे. याची पुढील सुनावणी 17 डिसेंबरला होणार आहे.

यापूर्वी मुंबई सत्र आणि दिवाणी न्यायालयाने शरद पवार यांना आठवडाभरासाठी मुंबई क्रिकेट असोशिएशनचा कारभार पाहण्यासाठी मनाई केली होती. मुंबई दिवाणी आणि सत्र न्यायालयाने हा आदेश देतानाच शरद पवार यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठीही संमती दिली होती.

गोपीनाथ मुंडे हे मुंबईचे रहिवासी नाहीत, या कारणावरून मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज फेटाळला होता.