आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Help Of Shan Watson's 122 Runs Austrilia Defeat Windies

शेन वॉटसनच्या 122 धावांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाचा विंडीत वर विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबरा - सलामीवीर शेन वॉटसनच्या शानदार 122 धावांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने तिस-या वनडेत वेस्ट इंडीजला सहजपणे 39 धावांनी पराभूत केले. या विजयासह यजमान कांगारूंनी मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांदरम्यान आणखी दोन वनडे होतील. चौथा सामना 8 फेब्रुवारी रोजी सिडनीत तर पाचवा सामना 10 रोजी मेलबर्न येथे होईल.

प्लेअर ऑफ द मॅच वॉटसनने 111 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने तुफानी शतक ठोकले. फिलिप ह्यूजनेसुद्धा 86 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 329 धावा काढल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजला 290 धावाच काढता आल्या. वेस्ट इंडीजकडून डॅरेन ब्राव्होने 86 तर डेवेन ब्राव्होने 51 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून फॉल्कनरने 48 धावांत 4 गडी बाद केले. यानंतर ह्यूजने क्लार्कसोबत (15) तिस-या विकेटसाठी 41 धावांची तर जॉर्ज बेली (44) सोबतही चौथ्या विकेटसाठी 42 धावा जोडल्या.

गेलच्या फलंदाजी क्रमात बदल
वेस्ट इंडीजने या वेळी सलामीवीर क्रिस गेलला पाचव्या क्रमांकावर खेळवले. सलामीवीर डेवोन थॉमसने 19, केरोन पॉवेलने 47, डॅरेन ब्राव्होने 86 आणि डेवेन ब्राव्होने 51 धावा काढल्या. डॅरेन ब्राव्होने 96 चेंडूंचा सामना करताना सात चौकार आणि एक षटकार मारला.

वॉटसनसोबत सातचा योगायोग
वॉटसनने सात महिन्यांनंतर सामना खेळला आणि सातवे शतक ठोकण्यात यश मिळवले. या सात महिन्यांत तो दुखापतीने त्रस्त होता. वॉटसनने अ‍ॅरोन फिंच (38) सोबत पहिल्या विकेटसाठी 89 आणि फिलिप ह्यूजसोबत (86) दुस-या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली.