आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरो हॉकी इंडिया लीग: दिल्ली-यूपी लढत ड्रॉ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश विझडर्सने शनिवारी हीरो हॉकी इंडिया लीगमध्ये दिल्ली वेव्हरायडर्सला 1-1 ने बरोबरीत रोखले. दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण मिळाले.
कर्णधार व्ही. आर. रघुनाथने केलेल्या गोलच्या बळावर यूपी विझर्ड्सचा पराभव टळला. दमदार सुरुवात करत दिल्लीने अवघ्या सहाव्या मिनिटांत आघाडी घेतली. सायमन चाइल्डने दिल्लीकडून गोलचे खाते उघडले. पिछाडीवर पडलेल्या उत्तर प्रदेशकडून व्ही. रघुनाथने 25 व्या मिनिटाला गोल केला. या गोलच्या बळावर यूपीला मध्यंतरापूर्वी 1-1 ने बरोबरी मिळवता आली.

कॅटरिनाची उपस्थिती
लखनऊ येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर दिल्ली व यूपी विझर्ड्स सामन्यादरम्यान सिनेअभिनेत्री कॅटरिना कैफची खास उपस्थिती होती. या वेळी नर्गिस फाखरी, मुख्यमंत्री अखिलेश यादव व हॉकी इंडियाचे महासचिव नरेंद्र बत्रादेखील उपस्थित होते.