आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरो इंडियन सुपर लीगच्या बोधचिन्हाचे अनावरण, १२ ऑक्टोबरपासून स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मी केवळ फुटबॉल या खेळाचा पाठीराखा नाही, तर सर्वच खेळ मला आवडतात. आपला देश सुदृढ, सशक्त आणि तंदुरुस्त व्हावा ही माझी इच्छा आहे, अशी भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज मुंबईत व्यक्त केली. हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाच्या अनावरण सोहळ्यात तो बोलत होता. या फुटबॉल लीगच्या संघांपैकी केरळ ब्लास्टर्स संघाची मालकी सचिनकडे असून याप्रसंगी अन्य संघाचे मालकही उपस्थित होते.

या फुटबॉल लीगच्या मालकांपैकी प्रमुख प्रसिद्ध व्यक्ती त्यांचे संघ असे आहेत, सचिन तेंडुलकर केरळ ब्लास्टर्स, रणबीर कपूर टीम मुंबई, अभिषेक बच्चन टीम चेन्नई, समीर मनचंदा दिल्ली डायनामोज, जॉन अब्राहम नॉर्थ ईस्ट युनायटेड, सलामन खान पुणे सिटी, वरुण धवन एफसी गोवा, सौरव गांगुली अॅथलेटिको डी कोलकाता. याप्रसंगी नीता अंबानी, खासदार प्रफुल्ल पटेेल यांची उपस्थिती होती.

इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या बोधचिन्हाचे अनावरण करताना सचिन, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मान्यवर.