आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाई आणि बाटलीच्‍या सवयीने या खेळाडूचे करिअर आले संपुष्‍टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेत सध्‍या क्रिकेटचे चांगलेच वातावरण निर्माण झाले आहे. भारत, ऑस्‍ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका 'अ' या टीममध्‍ये तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर भारताची वरिष्‍ठ टीम आफ्रिका दौ-यावर जाणार आहे. टीम इंडिया आणि आफ्रिका यांच्‍यात होणा-या या मालिकेवर सा-या क्रिकेट जगताचे लक्ष लागून आहे.

दक्षिण आफ्रिका कायम क्रिकेट जगतातील दमदार टीम म्‍हणून ओळखली गेली. मात्र, मोठया सामन्‍यांसाठी या टीमला चोकर्स म्‍हटले जाते. तरीसुद्धा या टीमच्‍या अनेक खेळाडूंची नावे रेकॉर्ड बुकात नोंद आहेत.

तर काही अशीही नावे आहेत, की जे टॅलेंटेड असूनही आपल्‍या चुकीच्‍या सवयींमुळे महान खेळाडूंमध्‍ये गणले गेले नाही. अशा नावांमध्‍ये सर्वात आघाडीवर आहे तो म्‍हणजे हर्षेल गिब्‍ज. सलामीवीर गिब्‍ज जेव्‍हा क्रीजवर असत तेव्‍हा त्‍याला रोखणे प्रतिस्‍पर्धीला कठीण जात. परंतु, हा खेळाडू क्रिकेटपेक्षा वादांमुळेच जास्‍त गाजला.

ग्रूप सेक्‍सपासून अंमली पदार्थाचे सेवन ते मॅच फिक्सिंगसारख्‍या प्रकरणातही गिब्‍जचा समावेश राहिला आहे. दोन वर्षांपूर्वी गिब्‍जने आपले आत्‍मचरित्र 'टू द पॉईंट'मध्‍ये आपल्‍या 14 वर्षांच्‍या करिअरमधील अनेक गोष्‍टी उजेडात आणल्‍या आहेत.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या चुकीच्‍या सवयींमुळे करिअरची वाट लागलेल्‍या या धमाकेदार खेळाडूविषयी...