आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून आयोजित यावर्षी सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या विश्व सीरिज हॉकी लीग स्पर्धेचा अंतिम सामना भारतात होणार आहे. 2014 च्या फेब्रुवारीमध्ये विश्व सीरिज हॉकी स्पर्धेचे फायनल होईल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष लिएंड्रो नेग्रे यांनी मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे दिली.
आयएचएफकडून आयोजित विश्व सीरिज हॉकी स्पर्धेला यावर्षी होत असलेल्या लंडन ऑलिम्पिकनंतर सप्टेंबरमध्ये सुरुवात होईल. ही विश्व सीरिज हॉकी लीग प्रत्येक दोन वर्षांनी आयोजित केली जाईल. यानंतर वर्ल्डकप आणि ऑलिम्पिकसाठी याच विश्व सीरिज लीगमधून संघांना पात्रता गाठावी लागेल. याचाच अर्थ ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या हॉकी स्पर्धा या वेळी अखेरीस होत आहेत. यानंतर बहुदा ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या स्पर्धा आयएचएफकडून आयोजित केल्या जाणार नाहीत.
आतापर्यंत पुरुष गटात 80 आणि महिला गटात 58 संघांनी विश्व सीरिज हॉकी स्पर्धेसाठी सहभाग निश्चित केला आहे. लीगमधील महिला गटाचा अंतिम सामना 2013 मध्ये अर्जेंटिनामध्ये होईल, असेही या वेळी नेग्रे यांनी
सांगितले. शिवाय 2014 पासून ऑलिम्पिक आणि वर्ल्डकप हॉकीत यजमान देश, पाच उपखंड विजेता संघ आणि विश्व सीरिजमधून साधारणपणे सहा ते सात संघ सहभागी होतील. विश्व सीरिज हॉकी स्पर्धा चार टप्प्यांत खेळवली जाईल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे कार्यकारी अधिकारी केली फेयरवेदर यांनी दिली.
विश्व सीरिज हॉकीबाबत हॉकी इंडियाने निर्णय घ्यावा : आयएचएफ - भारतात होत असलेल्या वर्ल्ड सीरिज हॉकी स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांवर बंदी लावायची की नाही, हा निर्णय हॉकी इंडियाचा आहे. ही स्थानिक स्पर्धा आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय महासंघ हस्तक्षेप करणार नाही. याबाबत हॉकी इंडियालाच निर्णय घ्यावा लागेल, असे आयएचएफचे अध्यक्ष नेग्रे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय महासंघाकडून मान्यता नसलेल्या या वर्ल्ड सीरिज हॉकीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय खेळाडूंनाच घ्यायचा आहे. मात्र, आयएचएफचे स्वत:चे काही नियम आहेत, असेही त्यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.