आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Gives Order To Nimbus To Pay Pending Amount

305 कोटी भरण्याचे निम्बसला आदेश

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमधील मालिकांच्या प्रक्षेपणापोटी 305 कोटी रुपयांची रक्कम भारतीय क्रिकेट नियामक आयोगाकडे सुपूर्द करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने निम्बस कम्युनिकेशन्स कंपनीला दिले आहेत. निम्बसकडे निओ स्पोर्ट्स, निओ क्रिकेट या वाहिन्यांची मालकी आहे.
ही रक्कम दोन आठवड्यांत बँक गॅरंटीच्या रूपात जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठाने दिले. क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपण शुल्काबाबत केलेल्या कराराचे उल्लंघन बीसीसीआयने केल्याचा आरोप निम्बसने केला होता. पण न्यायालयाने बीसीसीआयचे म्हणणे ग्राह्य ठरवत निम्बसला ही रक्कम देण्याचे आदेश दिले. 15 ऑक्टोबर 2009 रोजी बीसीसीआय आणि निम्बसदरम्यान कसोटी क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणासंदर्भात करार झाला होता. त्यानुसार प्रत्येक कसोटीमागे 31 कोटी 25 लाख रुपये बीसीसीआयला देण्याचे ठरले होते. मात्र, निम्बसने ही रक्कम बीसीसीआयला दिली नाही. त्यामुळे डिसेंबर 2011मध्ये बीसीसीआयने करार रद्दबातल ठरवला होता. आपली देणी देण्यासाठी निम्बसने मिळवलेल्या महसुलाचा वापर करावा, अशी मागणी बीसीसीआयने केली होती.