आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Himachal Pradesh Vs Maharashtra Kuchbihari Cricket Match

हिमाचलविरुद्ध महाराष्ट्र सुस्थितीत, विजय झोलचे शतक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुणे येथे सुरू असलेल्या कुचबिहार करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात हिमाचल प्रदेशविरुद्ध 6 बाद 272 अशी समाधानकारक धावासंख्या उभी केली. जालन्याच्या विजय झोलने शानदार शतक साजरे करत आजचा दिवस गाजवला.
सुब्रतो रॉय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना राज्याच्या संघाने दिवसअखेर पहिल्या डावात 6 बाद 272 धावा काढल्या. यात सलामीवीर विजय झोलने 20 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 121 धावांची खेळी साकारली. त्याला प्रशांत चोप्राने ए. वशिष्टकरवी झेलबाद केले. जय पांडेने 24, तर अभिजित साळवीने 21 धावा केल्या. दिवसअखेर शुभम रांजणे नाबाद 51, तर काझी नाबाद 18 धावांवर खेळत आहे. गोलंदाजीत अंकुशकुमार, राहुल सिंग आणि प्रशांतने प्रत्येकी 1 गडी बाद केला.