आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी : अठरा वर्षांत प्रथमच भारताचा हॉलंडवर विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - भारतीय हॉकी संघाने चमत्कारिक कामगिरी करताना हीरो चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत हॉलंडवर ३-२ ने ऐतिहासिक विजय मिळवला. गेल्या १८ वर्षांत वर्ल्डकप आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या हॉलंडवर भारतीय हॉकी संघाचा पहिलाच विजय ठरला आहे.

या विजयाने गेल्या पराभवाची मरगळ झटकली गेली असून मागच्या १८ वर्षांच्या पराभवाची मालिकाही सरदार सिंगच्या संघाने खंडित केली आहे. भारताने यापूर्वी १९९६ मध्ये बार्सिलोना येथे ऑलिम्पिक क्वालिफाइंग सामन्यात हरवले होते. या विजयानंतर भारताने ब गटात तिसरे स्थान मिळवले आहे. भारताचा पुढचा सामना बेल्जियमसोबत गुरुवारी होईल. भारताकडून या लढतीत एस. व्ही. सुनील (३३ व्या मिनिटाला), मनप्रीत सिंग (४७ व्या मिनिटाला) आणि रुपिंदरपाल सिंग (४९ व्या मिनिटाला) यांनी गोल केले. हॉलंडकडून मिंक वॅन डर वेडेनने दोन गोल (३६, ५८ वे मिनिट) केले.