आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hockey Champions Trophy: Today India Pakistan Fight

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत-पाकिस्तान आज काट्याची लढत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - आशियाई चॅम्पियन भारत आणि ‘जायंट किलर’ पाकिस्तान यांच्यात शनिवारी एफआयएच हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काट्याची टक्कर रंगणार आहे. हे दोन्ही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्य सामन्यात समोरासमोर असणार आहेत. त्यामुळे चाहत्यांची या सामन्याकडे खास नजर लागलेली आहे. या सामन्यात पाकचा धुव्वा उडवून अंतिम फेरीतील
प्रवेशाचा यजमान भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे पाक संघही विजयासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे ही लढत अधिकच रोमांचक होण्याची शक्यता आहे.

नुकताच इंचियोन आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकाने भारतीय संघाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. याच बळावर सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली यजमान भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारताने उपांत्यपूर्व सामन्यात जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या बेल्जियमला धूळ चारली. आता ही विजयी लय उपांत्य सामन्यातही
कायम ठेवण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. यासाठी संघातील खेळाडू सज्ज झाले आहेत. या वेळी घरच्या मैदानाचाही यजमानांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक चाहत्यांच्या पाठबळानेही यजमान भारतीय संघाचा उत्साह द्विगुणित होईल.

भारत पराभवाचा वचपा काढणार : मेलबर्न येथे २०१२ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पाकने भारताचा पराभव केला होता. या पराभवामुळे भारताचे कांस्यपदक हुकले. तसेच भारताला पदकाविना स्पर्धेतून मायदेशी परतावे लागले. आता याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी यजमान भारताकडे आहे. याकडे भारतीय संघातील खेळाडूंचे लक्ष आहे.

भारताविरुद्ध पाकिस्तान संघाचा विजयी चौकार!
आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध विजयाचा चौकार मारला आहे. या संघाने २००२, २००३, २००४ आणि २०१२ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला धूळ चारली होती. मात्र, त्यापूर्वी १९८२ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकचा धुव्वा उडवला होता.

ऑस्ट्रेलिया-जर्मनी झुंजणार!
जगातील नंबर वन ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी संघ उपांत्य सामन्यात झुंजणार आहे. या सामन्यात बाजी मारून अंतिम फेरी गाठण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे जर्मनी संघदेखील जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे गतविजेत्याला नमवून फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी जर्मनीचा संघ सज्ज झालेला आहे.