आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी इंडिया लीग : पंजाब-रांची रायनोज उपांत्य लढत उद्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - पंजाब वॉरियर्स आणि गतविजेत्या रांची रायनोज यांच्यात शनिवारी दुसर्‍या सत्रातील हॉकी इंडिया लीगचा उपांत्य सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याचा रांची टीमचा प्रयत्न असेल. मात्र, या टीमला यासाठी पंजाबच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. तसेच लीगच्या दुसर्‍या उपांत्य लढतीत उत्तर प्रदेश विझडर््स आणि दिल्ली वेव्हरायडर्स समोरासमोर असतील. तत्पूर्वी, पंजाबने लीगमधील शेवटच्या सामन्यात गतविजेता रांची रायनोजला 3-2 ने पराभूत केले. सामन्यातील पाचही गोल पेनॉल्टी कॉर्नरवर झाले. रंगलेल्या सामन्यात रांची मध्यंतरापर्यंत 1-2 पिछाडीवर होता. रांचीने सुरुवातीचा गोल करून 1-0 ने आघाडी घेतली. मात्र, पंजाब वारियर्सने पहिल्या हाफमध्ये दोन गोल केले व रांची टीमवर 2-0 ने आघाडी मिळवली होती.