आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी इंडिया लीग : मुंबईने रांचीला बराेबरीत राेखले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- तिसऱ्या सत्राच्या हाॅकी इंडिया लीगमध्ये बुधवारी दबंग मुंबई संघाने रंगतदार लढतीत यजमान रांची रायनाेजला बराेबरीत राेखले. हा राेमहर्षक सामना २-२ ने बराेबरीत राहिला. यासह मुंबईने घरच्या मैदानावर सामना जिंकण्याचा रांची संघाचा प्रयत्न हाणून पाडला.

पाहुण्या मुंबई संघाने दमदार सुरुवात करताना पहिल्या हाफमध्येच सामन्यावर पकड घेतली. या वेळी सामन्यात गाेलचे खाते उघडून मंुंबईने १-० ने अाघाडी घेतली. ग्लेन टर्नरने मुंबईला हे यश मिळवून दिले. त्यापाठाेपाठ सांता सिंगने गाेल करून मुंबईच्या अाघाडीला २-० ने मजबूत केले. यासह मुंबई संघाने सामन्यातील विजय जवळजवळ निश्चित केला हाेता. दरम्यान, यजमान रांची संघाने सामन्यात गाेलचे खाते उघडण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले. पहिल्या हाफपूर्वी रांचीला पेनाॅल्टी काॅर्नरवर गाेलची संधी हाेती. दुसऱ्या हाफमध्ये रांचीसाठी फाॅरवर्ड डॅनियल बेलेने गाेल केला. त्यापाठाेपाठ कर्णधार अॅश्लेने गाेल करून सामना बराेबरीत ठेवला. तसेच रांची संघाचा सामन्यातील पराभव टाळला.

विझर्ड्सचा आज सामना
उत्तर प्रदेश विझर्ड्स संघ हाॅकी इंडिया लीगमध्ये विजयासाठी उत्सुक अाहे. या संघासमाेर गुरुवारी कालिंगा संघाचे तगडे अाव्हान असेल.