आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hockey India League: Waveriders Looking To Continue Winning Streak

उत्तर प्रदेश विझर्ड्सची मुंबई मॅजिशियन्सवर 2-0 ने मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश विझर्ड्सने शनिवारी हीरो हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबई मॅजिशियन्सला 2-0 ने धूळ चारली. मुंबईचा हा लीगमधील नववा पराभव ठरला. केवळ एका सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला. स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे मुंबई उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. यूपी विझर्ड्सने लीगमध्ये तिसरा विजय मिळवला.

यजमान टीमने चांगली सुरुवात करताना नवव्या मिनिटाला आघाडी घेतली. प्रदीप मोरने यूपीकडून गोलचे खाते उघडले. मुंबईची टीम यूपीच्या मैदानावर फारसी चांगली कामगिरी करू शकली नाही. यजमानांना लढतीत 22 व 23 व्या मिनिटाला सलग दोन वेळा पेनॉल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. मात्र, कर्णधार व्ही.आर.रघुनाथ याचा फायदा घेऊ शकला नाही.

तसेच 32 व्या मिनिटाला पाहुण्या मुंबईने मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी हुकवली. मध्यंतरापर्यंत मुंबई टीम 0-1 ने पिछाडीवर होती. यूपी टीम 42 व्या मिनिटाला पुन्हा एकदा पेनॉल्टी कॉर्नरला गोल करण्यात अपयशी ठरली. या वेळी डोएनरने गोलसाठी प्रयत्न केला होता.मात्र, मुंबईच्या गोलरक्षकाने चेंडू रोखण्यात यश मिळवले. यूपीने 58 व्या मिनिटाला आपल्या आघाडीला मजबूत केले. तुषार खांडेकरने उजव्या बाजूने एलेग्रेला चेंडू पास केला. एलेग्रेच्या हिटला गोलरक्षक र्शीजेशने अडवले. मात्र, रिबाउंडमध्ये सिद्धार्थ शंकरने यूपीसाठी दुसरा गोल केला.

त्यानंतर मुंबईने 62 व 65 व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी हुकवली, तर शेवटच्या मिनिटाला मिळालेल्या पेनॉल्टी कॉर्नरवर मुंबईचा कर्णधार संदीपने मारलेला हिट गोलपोस्टवरून गेला.