आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी : भारतासमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेग - विजयी ट्रॅकवर परतलेल्या भारतीय संघाला विश्वचषक हॉकी स्पर्धेत सोमवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गत सामन्यात मलेशियाचा पराभव केला. यासह भारताने स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. तत्पूर्वी भारताने स्पर्धेतील तिसर्‍या सामन्यात स्पेनला बरोबरीत रोखले होते. यासह भारताने स्पर्धेतील आपली कामगिरी उंचावली. भारताला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल. मात्र, ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.
इंग्लंड-बेल्जियम झुंजणार
अ गटात इंग्लंड व बेल्जियम यांच्यात झुंज रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केले होते.