आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hockey Pak Players Hurl Obscene Gestures Towards Crowd

चॅपियंस ट्रॉफीः भारतावर विजय मिळवताच पाकिस्तानच्या खेळाडूंचे मैदानात असभ्य वर्तन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - हॉकी चॅंपियन्स ट्रॉफीमध्ये भारतावर वियय मिळवल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंतर्फे असभ्य वर्तन करण्याचा प्रकार घडला आहे. विजयाच्या जल्लोषात पाकिस्तानी खेळाडू इतके बुडालेले होते की, त्यांनी स्टेडियममध्ये बसलेल्या दर्शकांसोबत असभ्य वर्तन करण्यास सुरूवात केली. या सर्व घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडूंतर्फे खेळाच्या सर्व भावना आणि नियम पायदळी मिळवल्या असल्याचे सिद्ध होत आहे.

त्याचे झाले असे की, सामन्यात भारतावर विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी सर्वात पहिले अंगावरील टी-शर्ट काढले नंतर डान्स करत-करत मैदानात उपस्थित दर्शकांना अश्लिल शिव्या आणि घाणेरडे इशारे करण्यास सुरूवात केली.
या सर्व प्रकारणानंतर हॉकी इंडियाचे महासचिव नरेंद्र बत्रा म्हणाले की, आम्ही 'पाकिस्तानी खेळाडूंच्या या वागणुकीची तक्रार करणार आहोत. पाकिस्तानी खेळाडूंचे हे वागणे खेळ भावना आणि आचार संहितेचे उल्लंघन करणारे आहे. या मालिकेचे अध्यक्ष वियर्ट डॉयर म्हणाले की, 'मी पाकिस्तानी संघाचे कोच शहनाज शेख यांच्याशी या सर्व घटनेवर चर्चा केली असून त्यांनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंच्या वतीने माफी मागितली आहे. तसेच अशी चुक पुन्हा घडणार नसल्याचे त्यानी सांगितले आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

असे वागणे बरोबर नाही - राजपाल सिंह
भारतीय संघाचे माजी कर्णधार राजपाल सिंह म्हणाले की, ही वर्तवणूक पाकिस्तानी खेळाडूंसाठी लाजीरवाणे आहे. दर्शकांसोबत त्यांनी असा व्यवहार करायला नको होता.

आज जर्मनीशी मुकाबला-
अंतिम सामन्यात पाकिस्तामचा मुकाबला रविवारी (ता.14) रोजी जर्मनीशी होणार आहे. जर्मनीने सेमीफायनलमध्ये विश्व चॅंपियन ऑस्ट्रेलियाला 3-2 ने पराभूत केले. तर भारतीय संघ तिस-या स्थानासाठी ऑस्ट्रेलियाशी सामना खेळणार आहे. 1982 नंतर पदक जिंकण्याची भारतीय संघाकडे पुन्हा एक संधी आहे.

100 सेकंद पहिले झालेल्या गोलमुळे हारला भारत
शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करू देण्याच्या सवयीमुळे शनिवारी (ता.13) रोजी भारताला चॅंपियंस ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहण्याची संधी सोडावी लागली. पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये भारताला 4-3 ने पराभूत केले. पाकिस्ताने ज्यावेळी चौथा निर्णायक गोल केला त्यावेळी सामन्याचे केवळ 100 सेकंद बाकी होते. या गोलमुळे 36 वर्ष जुन्या असलेल्या मालिकेच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा प्रवेश करण्याचा विचार असलेल्या भारतीय संघाच्या आशेवर पाणी फिरले आहे. 16 वर्षानंतर पाकिस्थानी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा पाकिस्तानी खेळाडूंनी कशी उडवली खेळ भावनांची खिल्ली