आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानविरुद्ध भारताला अाज विजयी हॅट्ट्रीकची संधी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिसऱ्या सामन्यात जपानच्या खेळाडूंना हुलकावणी देताना भारतीय संघाचा खेळाडू.
भुवनेश्वर - सरदारासिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शनिवारी जपानविरुद्ध हाॅकी मालिकेत विजयी हॅट्ट्रीक नाेंदवण्यासाठी सज्ज अाहे. भारतीय संघाने सलगच्या दाेन विजयांसह चार सामन्यांची मालिका २-० ने अापल्या नावे केली. या मालिकेतील सलामीचा सामना १-१ ने बराेबरीत राहिला हाेता. अाता मालिकेतील चाैथ्या सामन्यात शनिवारी भारत अाणि जपान संघ समाेरासमाेर असतील.

अागामी एफअायएच वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलच्या तयारीसाठी या चार सामन्यांच्या मालिकेचे अायाेजन करण्यात अाले. सुलतान अझलनशाह स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने मालिकेत शानदार दाेन विजय मिळवले.

जपानचा शेवटचा धक्का!
जपानला अद्याप मालिकेत समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. मात्र, सामना जिंकून मालिकेतील शेवट गाेड करण्याचा पाहुण्या जपान संघाचा प्रयत्न असेल. त्यासाठी जपानच्या टीमला भारताला राेखण्यासाठी माेठी मेहनत घ्यावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...