औरंगाबाद-जबरदस्त फॉर्मात असलेल्या वॉरियर्स क्लबने सोमवारी स्व. व्ही. लक्ष्मीनारायण स्मृती चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत किंग्ज क्लबचा धुव्वा उडवला. या टीमने साखळी सामन्यात 12-1 अशा फरकाने शानदार विजय मिळवला. शेख जावेद, शेख अमान आणि सय्यद सत्तार यांनी प्रत्येकी तीन गोल करून संघाचा एकतर्फी विजय निश्चित केला. अभिजित बादुलेने संघाच्या विजयात एका गोलचे योगदान दिले. तसेच या सामन्यात अश्विन गुंडलेने किंग्ज क्लबसाठी एकमेव गोल केला. या विजयासह वॉरियर्स टीमने स्पर्धेत सहा गुणांची कमाई केली.
रामाचे शानदार पाच गोल
दुसया सामन्यात चॅलेंजर्सने डॅझलर्सचा 12-1 अशा फरकाने पराभव केला. रामा बीने केलेल्या पाच गोलच्या बळावर चॅलेंजर्सने सामना जिंकला. शेख आझम आणि अकबर खान यांनी संघाला प्रत्येकी दोन गोलचे योगदान दिले. दुसरीकडे स्ट्रायकर्सने लायन्सला 7-2 ने पराभूत केले. अक्षय दारेलूने चार, रणजित ठाकूरने दोन आणि मोहंमद दानिशने एक गोल करून संघाला विजय मिळवून दिला.
आजचे सामने
स्ट्रायकर्स वि. टायगर्स
लायन्स वि. आयान
वॉरियर्स वि. चॅलेंजर्स